चाळीसगाव शहरातील पहिली भव्य टाऊनशिप
.png)

शिवनेरी पार्क - माझं स्वराज्य.
‘सुपरिअल्टी बिल्डकॉन एल.एल.पी.' मोठ्या अभिमानाने सादर करीत आहेत, जनसामान्यांच्या सर्व गरजा ओळखून तयार केलेला, तुमच्या मनावर राज्य करणारा चाळीसगाव शहरातील पहिला आणि भव्य गृहप्रकल्प 'शिवनेरी पार्क' - माझं स्वराज्य. चाळीसगाव मधील सर्वात मोठी टाऊनशिप, ज्यात आहेत तब्बल 481 - १ बी.एच.के फ्लॅट्स, 327 रो बंगलोज् आणि 41 कमर्शिअल शॉप्स व ऑफिसेस. घर असो, बंगलो अथवा व्यवसाय - तुमच्या मनातील या स्वराज्यात सगळं एकाच ठिकाणी जीवनावश्यक सोयी - सुविधांसह उपलब्ध असेल. आपल्या कुटुंबासह आपल्या हक्काच्या घरात वास्तव्य करताना तुमच्या मनात माझं घर, माझा स्वाभिमान याच भावना असतील याची आम्हाला खात्री आहे.

481
1BHK फ्लॅट्स
327
रो - बंगलोज्
41
कमर्शिअल शॉप्स / ऑफिसेस

माझं घर, माझा अभिमान! - 327 रो बंगलोज्
आपल्या हक्काच्या घरात राहण्याचं स्वातंत्र्य अनुभवताना तुम्हाला टाऊनशिपच्या सुरक्षेची हमी देणारे रो बंगलोज् शिवनेरी पार्कमध्ये उपलब्ध आहेत. पार्कींग एरियासह प्रशस्त रो बंगलोज् आणि तुमचे जीवनमान उंचावणाऱ्या ॲमेनिटीज तुमच्या व कुटुंबाच्या चेहऱ्यावर सदैव आनंद निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत.
हे नुसतं घर नाही, हे 'स्वराज्य' आहे!
शिवनेरी पार्क हा चाळीसगाव मधील असा गृहप्रकल्प आहे जिथे आहेत तुमच्या इथल्या जगण्याला अधिक आनंददायी करणाऱ्या सुनियोजित ॲमेनिटीज. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाचा विचार करून देण्यात आलेल्या या ॲमेनिटीज तुमचं येथील जगणं राजेशाही करतात. त्यामुळे तुमचं येथील घर केवळ घर राहत नाही तर ते असतं तुमच्या हक्काचं स्वराज्य. तुमच्या हक्काच्या स्वराज्यातील तुमचा आनंद आणि जगणं या ॲमेनिटीज द्विगुणित करतात याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल.
उत्तम कनेक्टिव्हिटी असलेलं लोकेशन
अत्यंत वेगाने विकसीत होणाऱ्या चाळीसगाव मध्ये तुमच्या कनेक्टिव्हीटीचा पुरेपूर विचार करून आम्ही शिवनेरी पार्क हा प्रकल्प साकारत आहोत. इथून शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बँक आणि एटीएम अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. यासोबतच शिवनेरी पार्क हा प्रकल्प अगदी शांत व निसर्गसंपन्न लोकेशनवर असून इथे तुमच्या जगण्याला नेहमीच आल्हाददायक वातावरण सोबतीला असेल, याचा अनुभव तुम्हालाही येईलच.


